एचपीसीएल मित्तल एनर्जीच्या मुख्य कार्यकारी आधीकारी पदावर तगडा पगार देऊन नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ कंपनीच्या काही अधीकार्यांनी बंडाचे निशानं उभारले आहे.
कंपनीतील अधीकार्यांनी संप सुरू केला असून तो अनिश्चित काळासाठी असल्याचे मत हिंदुस्तान पेट्रोलियम मेनेजमेंट स्टाफ असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या जवळपास साडेतीन हजार अधीकार्यांनी संपात आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे.प्रभ दास यांची या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधीकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कंपनीने वर्षाला एक कोटीचे पॅकेज दिले आहे,
कंपनीच्या या निर्णयावर अनेक आधीकारी नाराज असून, कंपनीने या विषयी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे आवाहनही संघटनेने केले आहे.
|