मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पोलाद उत्पादक किंमत कपातीस तयार
भाषा
पोलादाच्या किंमतवाढीने अर्थव्यवस्थेवरील किंमतवाढीचा दबाव लक्षात घेऊन प्रमुख पोलाद उत्पादकांनी प्रति टनामागे चार हजार ते दोन हजार रूपयांपर्यंत किंमत कपात करण्याचा निर्णय घेऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी उद्योगांनी सामाजिक बांधीलकी जपण्याचे आवाहन केले होते. किंमतवाढीस पोलादाच्या किंमती हातभार लावत असल्याच्या सरकारच्या‍ चिंतेपासून अवगत असल्याचे सांगून फ्लॅट उत्पादनाचे टनामागे सहा हजार तर बार व पुनर्घडीत पोलादाची टनामागे दोन हजाराने किंमत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे 'सेल' चे अध्यक्ष सुशील कुमार रूंगठा यांनी सांगितले.

किंमतवाढीस कारणीभूत असलेले सर्व उत्पादक किंमत कपात करणार आहेत. मात्र निर्यात करण्यात येणार्‍या उत्पादनास या किंमती लागू होणार नाही. पोलाद उत्पादकांच्या प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांना स्थितीची माहिती दिली. बैठकीत वित्तमंत्री पी चिदंबरम, पोलादमंत्री रामविलास पासवान व मंत्रिमंडळे सचिव के एम चेंद्रशेखर हेही उपस्थित होते.
आणखी
जेटची मुंबई ते बँकॉक थेट हवाईसेवा
रिझर्व बँक घेणार किंमतवाढीचा आढावा
एचपीसीएल आधीकारी बेमुदत संपावर
एमटीएनसाठी आताच बोली नाही- एअरटेल
व्होडाफोनने एसटीडीदर घटवले
व्होडाफोन भारतात विकणार आयफोन