पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आगामी महिन्यात किंमतवाढ नियंत्रित करण्याबाबत विश्वास व्यक्त करताना गरीब व संवेदनशील घटकांना यापासून संरक्षण देण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
त्यांनी उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करताना किंमतवाढ रोखण्याबाबत विश्वास व्यक्त केला. काही आठवड्यापासून किंमतवाढीबाबत चिंतेचे वातावरण असल्याचे स्पष्ट करताना या ट्रेंडला आंतरराष्ट्रीय परिमाण असल्याचे सांगितले.
तीन वषार्पपूर्वी तेलाच्या किंमती बॅरलमागे 35 अमेरिकन डॉलरहून एकशे वीस डॉलरपर्यंत पोहचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात अन्नधान्य व वस्तूंच्या किंमतीही याच प्रमाणात वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|