आरपीजी ग्रुप कंपनी स्पेंसर रिटेल मार्केटमध्ये आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी पुढील १२ महिन्यांमध्ये १५०० कोटीची गुंतवणूक करणार आहे.
आरपीजी ग्रुपच्या सीईएससी लिमिटेड कंपनीचे उपाध्यक्ष संजीव गोयंका यांनी ही माहिती दिली. कंपनीच्या दुकानांची संख्या ३१ वरून ७१ करण्याचा कंपनीचा विचार असून यासाठी पुढील १२ महिन्यांत कंपनी १५०० कोटीची गुंतवणूक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कंपनी सध्या ४०० छोटे दुकानांचे संचलन करत असून पुढील वर्षापर्यंत त्यांची संख्या ६५० करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
|