मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जून पर्यंत शेतकर्‍यांचे कर्ज माफ- चिदंबरम
केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगत 30 जून पर्यंत देशातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी काल पुन्हा केली.

सिंगमपुनारी‍तील ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सच्या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आले असताना त्यांनी ही घोषणा केली.

सरकारने कर्ज माफीची घोषणा केल्यानंतर काहीजण जाणून बुजून त्याचा अपप्रचार करत असल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीका केली.

विरोधकांना असे वाटत आहे, की सरकारच्या या घोषणे नंतर जनतेच्या मनात सरकार विषयी आपुलकी निर्माण होईल, त्यामुळे ते या योजनेचे अपप्रचार करत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला.
आणखी
स्पेंसर कार्यविस्तारासाठी गुंतवणूक करणार
महागाईदर ७.६१ टक्क्यांवर
आयडीएफसी जमवणार एक अब्ज
इन्फोटेक आणि पावरकोरचा करार
किंमतवाढ नियंत्रणाबाबत विश्वास: पंतप्रधान
एमआरपीएलला 1272 कोटीचा नफा