डॉलरची परिस्थिती काहीशी सुधारल्याने आणि तेलाचा पुरवठा सुरळित चालू होण्याच्या शक्यतेने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे गगनाला भिडलेले भाव सोमवारी पुन्हा काहीसे घसरले.
गेल्या दोन दिवसांपासून हे भाव 126 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या अर्थव्यवस्था मंदावण्याच्या भितीने तेलाचे भाव अचानक वाढले होते.
ओपेकने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये होणार्या बैठकीत तेलाचे भाव वाढवण्यावर विचार करण्यात येणार असल्याचे ओपेकने स्पष्ट केले आहे.
|