इराक लवकरच काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी तेल उत्पादन वाढवण्यासंबंधीच्या करारांची घोषणा करणार असून, यात अमेरिकेची मदत घेण्यात येणार आहे.
अमेरिकेने 2003 साली केलेल्या हल्ल्यांनंतर इराकमध्ये तेलाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यात गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या वाढत्या किंमती आणि निर्माण झालेल्या तुटवड्याने आता तेलाचा पुरवठा वाढवण्याचा निर्णयही इराक सरकारने घेतली आहे.
यानंतर देशातील रमैल, किरकुक, जुबेर या प्रांतातील तेलाच्या विहिरींचे उत्पादन वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे.
|