रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता देशातील खाजगी बँकांनीही आपल्या पीएलआर दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, देशातील दुसरी मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या पीएलआर दरात 0.75 टक्के वाढ करण्याची घोषणा केली.
तीन जुलै पासून हे दर लागू होणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. यापूर्वी 16 जून रोजी या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती.
|