भारतातील धनदांडग्यांचा संपत्तीचे योग्य नियोजन करण्यासाठी रिलायंस मनीने वेल्थ मॅनेजमेंट सेवा सुरू केली आहे. येत्या तीन वर्षात या माध्यमातून कंपनीचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा यानंतर कंपनीने व्यक्त केली आहे.
अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या रिलायंस कॅपिटल लिमिटेडची सहाय्यक कंपनी असलेल्या रिलायंस मनीने 2007-08 या वर्षात 40 कोटीचे उत्पन्न कमावले होते.
देशात आज जवळपास 13 लाख जणांना त्यांच्या संपत्तीचे योग्य नियोजन करण्यासाठी सल्ला देण्याची गरज आहे. परंतु त्यांना योग्य सल्लाच मिळत नसल्याने ते चुकीच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवत असून, त्यांना योग्य सल्ला देण्याचे काम रिलायंस करणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी सुदीप बंदोपाध्याय यांनी दिली.
बंदोपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायंसच्या या नवीन सेवेत इक्विटी लिंक्ड पोर्टफोलियो मॅनेजमेंट. टॅक्स प्लॅनिंग. आर्ट एडवाइजरी आणि रियल इस्टेट आदीचा समावेश असेल.
|