महागाईदराचा आलेख दिवसें दिवस वाढतच असून आता 21 जून रोजी संपलेल्या आठवड्यानंतर या दरात 0.21 टक्क्यांची वाढ झाल्याने हे दर 11.63 टक्क्यांवर पोहचले आहेत.
गेल्या तीन आठवड्यांपासून हे दर सातत्याने 11 टक्क्यांवरच असल्याने सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. ट्रक आणि ट्रान्स्पोर्टरांच्या संपानंतर तर प्राथमिक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.
आता महागाईदर पुन्हा एकदा वाढल्यानंतर वस्तूंचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत हे दर 4.32 टक्के इतके होते.
|