मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भक्कम अर्थव्यवस्थेबाबत वित्तमंत्र्यांना विश्वास  Search similar articles
भाषा
वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी अर्थव्यवस्था परत मजबूत स्थितीत येण्याबाबत विश्वास व्यक्त करताना योग्य दृष्टिकोन व संयम देशास किंमतवाढीसारख्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सहाय्यभूत ठरेल, असा आशावाद व्यक्त केला.

भारतासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या अर्थव्यवंस्थासमोर यासारखे प्रश्न उद्भवणारच. मात्र योग्य दृष्टिकोन, संयमाने समस्येचा सामना करण्यासोबतच तोडग्यासाठीही सहाय्यूत ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपण 1997-98 सारख्या आशियातील आर्थिक स्थितीतून व 1989-90 सारख्या परकीय चलनसाठ्याच्या आणीबाणीच्या समस्येतून यशस्वीपणे बाहेर आलो आहोत. हे लक्षात घेतल्यास आपण सद्याच्या परिस्थितीचा सामना करू शकणार नाही का? असा प्रश्न त्यांनी केला.

भारतास 1973 मधील पहिला ऑइल स्टॉक व 1979-80 मधील चोवीस टक्क्यांपर्यंत वाढलेल्या किंमतवाढीसारख्या गंभीर परिस्थितीचाही सामना करावा लागला.

किंमतवाढ साडेअकरा टक्क्यांवर पोहचल्यानंतरही बँका अद्यापही कर्ज व शैक्षक्षिक कर्जवाटप करत असून सुमारे बारा लाख विद्यार्थ्यांना वीस हजार कोटीचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

जागतिक बाजारपेठेत तेल भडकल्याने वस्तू व धातूंच्या किमतीत वृद्धीचा एकंदरीत किंमतवाढीवर परिणाम झाला आहे. मात्र संयमाने जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त फॉर्म्युल्याचा उपयोग करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी
तेलउद्योगावर कर आपल्या अख्यत्यारित नाही: देवरा
हेडेफच्या व्यवसायात 186.61 टक्क्यांची वाढ
मॉडर्न डेरीजने जमवले 28 कोटी
टाटाने लॉंच केले नवीन बस चेसिज
मतभेदानंतरही अमेरिका- इराणमध्ये व्यापार
समाजवादी पक्षाचे लक्ष्य मुकेश अंबानी