मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुकेश अंबानींनी घेतली पंतप्रधानांची भेट  Search similar articles
भाषा
सपुआ सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षाने रिलायंस इंडस्ट्रीजवर लक्ष साधल्यानंतर मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन विंडफॉल टॅक्स लादण्याची मागणी अर्थकारणास धरून नसल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मुकेश यांनी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. मुंबईहून सकाळी दिल्लीस पोहचल्यानंतर मुकेश यांनी मंत्रिमंडळ सचिव के एम चंद्रशेखर यांच्यासहित उच्चाधिकाऱ्यांची भेटी घेतल्या.

अमर सिंग यांनी रिलायंसच्या जामनगर येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा ईओयू दर्जा काढण्यासोबतच मुकेश व अनिल यांच्यात शांती प्रस्तापित व्हावी यासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मुकेश यांच्या भेटीस महत्त्व प्राप्त झाले आहे.
आणखी
वित्तमंत्र्यांनी करकपातीची शक्यता फेटाळली
शेअर डिपॉजीटरी कंपन्यांनाही ऑडिट सक्तीचे
वेल्स्पनला तिनहजार कोटींचे काम
महागाईदर 11.89 टक्क्यांवर
नॅनोचे उत्पादन ऑक्टोबरपासून
कारच्या विक्रीत वाढ