इक्विटी व्यवसायातील अब्जाधीश बिल्बर रॉस हे स्पाईसजेट हवाईवाहतूक उद्योगात तब्बल पावनेचारशे कोटीची गुंतवणूक करणार आहेत. उद्योगाच्या संचालक मंडळाने यास तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे स्पाईसजेटने स्पष्ट केले आहे.
रॉस यांच्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो. ते जगतील सर्वाधिक अनुभवी व मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. गुंतवणुकीनंतर स्पाईसजेटचा भारतातील आघाडीच्या हवाईवाहतूक उद्योगात समावेश होण्याबाबत संचालक मंडळाचे सदस्य भुलो कांसगरा यांनी आशावाद व्यक्त केला.
विल्बर रॉस यांची भारतीतील ही दुसरी गुंतवणूक आहे. मागील वर्षी त्यांनी वस्त्रउद्योग व तयार कपड्यांच्या क्षेत्रातील ओसीएम इंडियाचा सदतीस मिलियनला अधिग्रहन केले होते.
|