देशातील दुसऱ्या क्रमांकाचा कार उत्पादक उद्योग हुंडाईने 'i10' हे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. हुडाईची नवीन कार 1.2 लीटर कप्पा इंजिनाने सुसज्ज असून 3.99 ते 5.43 लाखाच्या दरम्यान ही उपलब्ध आहे.
यासाठीचे इंजिन भारतातच तयार करण्यात आले आहे. देशास लहान कार उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याची हुडाईची वचनबद्धता व्यक्त होत असल्याचे हुंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हेउंग सू लीन यांनी स्पष्ट केले.
हुंडाई मोटर जगतील पाचव्या क्रमांकाची कार उत्पादक उद्योग ठरला असून जागतिक विक्रीतील बारा टक्के वाटा भारतीय युनिटचा आहे.
|