वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी अर्थव्यवस्थेवर अजूनही किंमतवाढीचा दबाव असल्याचे स्पष्ट करून रिझर्व बँकेच्या बँकेच्या उपाययोनेमुळे किमतीवरील दबाव कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
गर्व्हनर वाय व्ही. रेड्डींनीही हेच स्पष्ट केले असून त्यांच्याशी सहमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चलनपुरवठ्याच्या उपाययोनांचा योग्य परिणाम झाल्यास किंमतवाढीत सुधारणा होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रिझर्व बँकेने मागील महिन्यात रेपो दरात 0.75 हून 8.5 टक्क्यांपर्यत वाढ केली होती. अन्नधान्य, व इंधनाच्या किंमतींनी पेट घेतल्यानंतर किंमतवाढीने 11.89 टक्क्यांचा उच्चांक गाठला होता. यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षास सत्ताधारी पक्षांवर टीका करण्यासाठी आयतेच कोलीत सापडले आहे.
|