मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
एअर इंडियाचे खर्चकपातीसाठी कठोर निर्णय?  Search similar articles
नागरी उड्ड्यनमंत्री पटेल यांचे संकेत
भाषा
राष्ट्रीय हवाई वाहतूक उद्योग एअर इंडियास नुकसान नियंत्रणासोबतच खर्चकपातीसाठी हवाई फेऱ्या कमी करण्यासारखे कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे नागरी नागरी उड्ड्यनमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. उद्योगाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

यासाठी तोट्यातील मार्ग बंद करावे लागतील. याचसोबत एकंदरीत खर्चातही कपात करावी लागेल. सर्वच हवाई वाहतूक सेवा मार्गकपात करत असून एअर इंडियाही यासारखेच पावले उचलण्याबाबत विचार करत आहे.

मात्र याप्रश्नी आपल्या मंत्रालयाने कोणतेही निर्देश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवाई सेवांनी अतिरिक्त क्षमतेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मात्र कनेक्टीव्हीटीमध्ये कपात असायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही हवाई वाहतूक उद्योगास सरकार अनुदान देत नाही. सरकारकडून त्यांना रोख मदतही मिळत नाही. त्यांच्या मिळकतीतूनच ते खर्च पूर्ण करतात. त्यांना हे शक्य आहे तोपर्यंत ठीक मात्र क्षमतेबाहेर गेल्यास त्यांना मार्गकपात करावीच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी
'अर्थव्यवस्थेवर अजूनही किंमतवाढीचे सावट'
शेअर बाजारात मोठी घसरण
जनरल मोर्टसची मोठी कर्मचारी कपात?
हुंडाईचे नवीन मॉडेल साडेपाच लाखापर्यंत
स्पाईसजेटमध्ये रॉस गुंतवणार पावनेचाशे कोटी
मुकेश अंबानींनी घेतली पंतप्रधानांची भेट