भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या प्रभावशाली जी-20 आघाडीने जागतिक बाजारातील वस्तूंच्या किमतीतील बदलाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत देशांवर कृषी अनुदान कपात करण्यासाठी दबाव निर्माण केला आहे.
स्थानिक अनुदान समाप्त करून एकंदरीत व्यापारात परिणामकारक कपात आवश्यक आहे. जागतिक बाजारपेठेतील वस्तूंच्या किमतीतील बदल व स्थानिक पातळीवरील अनुदानावरील परिणाम लक्षात घेता हे आवश्यक असल्याचे जी-20 ने मत मांडले आहे.
दोहा वाटाघाटींवर सहमतीसाठी बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी रेटण्यात आली आहे. कृषी व्यावारावरील नियंत्रण व असमान प्रमाणातील प्रतिनिधित्वासाठी विकसित देश कारणीभूत असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
|