खाजगी क्षेत्रातील विमा कंपनी असलेल्या मॅक्स न्यूयॉर्क लाईफ इंन्शोरन्सने चालू आर्थिक वर्षात 14 हजार कर्मचाऱ्यांसह 30 हजार एजंटची भरती करण्याचा निर्णय आज जाहीर केला.
आर्थिक मंदीचा फटका बसल्याने जगभरातील मोठ्या कंपन्या आणि बँका नोकर कपात करत असताना मॅक्सने घेतलेल्या निर्णयाचे तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. कंपनीला आर्थिक मंदीचा कोणताही फटका बसला
नसल्याने कंपनी कोणत्याही प्रकारची नोकर कपात करणार नसल्याचे कंपनीचे वरिष्ठ निदेशक अनिल मेहता यांनी स्पष्ट केले आहे. |