अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यापेक्षा नवनिर्वाचीत अध्यक्ष बराक ओबामा यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक असल्याने ते अमेरिकेच्या आर्थिक मंदीवर योग्य तोडगा शोधू शकतील असा विश्वास अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी व्यक्त केला आहे.
भारत आर्थिक शिखर संमेलनात चिदंबरम यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. ओबामांच्या बाबतीत आपण जितके वाचे आणि ऐकले आहे त्या नुसार ओबामा हे बुश पेक्षा सरस असल्याचे चिदंबरम म्हणाले.
जी-20 देशांच्या बैठकीत निघालेल्या निष्कर्षावर ओबामांचा दृष्टिकोन व्यापक असल्याने आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यास मदत होणार असल्याचेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. |