ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाईस तयार करणारी कंपनी मोजर बेअरने तूर्तास तरी नोकर कपात करण्यास नकार दिला आहे.
मोजर बेअर इंडियाचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक दीपक पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक मंदीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी कॉस्टकटींग करण्यावर कंपनीचा अधिक भर असून, कंपनी नोकर कपात करणार नाही.
कंपनीत सध्या 7500 कर्मचारी कार्यरत असून, कंपनीने तूर्तासतरी कपातीचा निर्णय घेतला नसल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले. |