कुर्दिस्तानात दोन ब्लॉकसाठी रिलायन्स कंपनीने केलेला करार अवैध असल्याचा आरोप इराकचे तेल मंत्री हुसेन अल शहरिस्तानी यांनी केला आहे.
रिलायन्सने एका वर्षांपूर्वी उत्तरी इराकमध्ये रोवी आणि सार्ता ऑइल ब्लॉकसाठी स्वायत्त कुर्दिस्तानच्या क्षेत्रीय सरकारसोबत एक करार केला होता.
सरकारच्या परवानगी शिवाय एखादी कंपनी जर तेलाचे उत्पादन करत असेल किंवा तेलाची वाहतूक करत असेल तर येथील कायद्यानुसार याला तस्करी मानले जाते. आणि याच आरोपाखाली कंपनीवर कारवाई केली जाते. त्यामुळे इराकमध्ये अशा स्वरूपाच्या कायद्यांना वैधता नसल्याने हा कायदा अवैध असल्याचे ते म्हणाले. |