राजस्थानातील बाडमेर येथे कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू करण्यासाठी केयर्न इंडिया कंपनी या वर्षा अखेर पर्यंत 1.8 अब्ज डॉलर अर्थात 9 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे प्रबंध निदेशक राहुल धीर यांनी दिलेल्या माहितीनुसार 2008 आणि 09 या वर्षात कंपनीने या प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. बाडमेर तेल क्षेत्रातील मंगला, भाग्यम आणि ऐश्वर्या तेल विहिरींतून कच्च्या तेलाचे उत्पादन यावर्षात जुलै पर्यंत कधीही सुरू करण्यात येऊ शकते. |