रियल इस्टेट क्षेत्रातील महाराष्ट्रातील मोठी कंपनी असलेल्या डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेडला पुण्यातील फुरसुंगी भागात विशेष आर्थिक क्षेत्राच्या निर्मितीसाठी सरकारने हिरवा कंदील दिला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 8 डिसेंबर 2008 पासूनच सरकारचा हा निर्णय लागू करण्यात आला असून, लवकरच या भागात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. |