ब्रिटनमधील सर्वात मोठी पोलाद निर्मिती करणारी कंपनी कोरसने या आठवड्यात तीन हजार 500 जणांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
लंडनमधील वृत्तपत्रांनी कंपनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले असून, जग्वार आणि लँड रोवरही नोकर कपात करण्याची तयारी करत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. कोरस या महिन्याच्या अखेरीस याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. |