याहूने यंदा आपल्या कर्मचा-यांना पगारवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मंदीवर मात करण्यासाठी खर्चावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकन कंपनी असलेल्या याहूचे प्रवक्ते किम रूबे यांनी सांगितले, की सध्याच्या आर्थिक स्थितीत खर्चांवर नियंत्रणाचे आमचे प्रयत्न सुरू असून त्यातील एका निर्णयानुसार कर्मचा-यांना पगारवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. |