मंदीमुळे केवळ दीड महिन्यात पाचव्यांदा टाटा मोटरर्सने ब्लॅक क्लोजर जाहीर केले होते. आता पुन्हा एकदा कंपनीने रविवारपासून आठ दिवसांसाठी कामकाज बंद ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. यानंतर कंपनीत उत्पादन थांबवण्यात आले आहे.
रविवार नंतर कंपनीने ब्लॅक क्लोजरची घोषणा केली. यापूर्वी कंपनीने पाचवेळा अशाच स्वरूपाची घोषणा केली होती. कंपनीच्या उत्पादनांची मागणी घटल्याने कंपनीला आपल्या जमशेदपूर येथील प्रकल्पात ब्लॅक क्लोजर जाहीर करावा लागल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. |