मोबाईल कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॅनिक्स कंपनी लिमिटेडने भारतीय बाजारात आपला पहिला आऊटडोअर फोन सॅमसंग मरीन बी 2100 लॉंच केला आहे.
कंपनीचे लखनो डिव्हिजनल प्रमुख सुनील दत्त यांनी दिलेल्या माहितीनुसार एंटी शॉक युरेथन मटेरियल ने युक्त हा फोन कोणत्याही परिस्थितीच चालू शकतो. फोन हातातून पडल्यास, अथवा त्यात पाणी गेल्यास आता ग्राहकांना काळजी करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.
मान्सूनमध्ये येणारे बदल झेलण्याची या हँडसेटमध्ये क्षमता असल्याचे दत्त यांनी स्पष्ट केले. |