वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » एअर इंडिया विमानाची आपत्कालीन लॅण्‍डींग
Feedback Print Bookmark and Share
 
शांघाईहून मुंबईकडे जात असलेल्‍या एअर इंडिया विमान आज नवी दिल्‍लीच्‍या इंदिरा गांधी आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर आपात्कालीन परिस्थितीत उतरविण्‍यात आले. या विमानात 172 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

वैमानिकाला विमानाच्‍या हायड्रोलिक सिस्‍टममध्‍ये काही तरी बिघाड झाल्‍याचे लक्षात येताच त्‍याने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्‍यानंतर विमानास तत्काळ आपात्कालीन परिस्थितीत नवी दिल्‍ली आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर उतरविण्‍यात आले.

यावेळी विमानतळावर अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहीका आणि बचाव यंत्रणा सज्ज झाल्‍या होत्या.
संबंधित माहिती शोधा