कंपनी आपल्या उत्पादनाच्या गुणवत्ता आणि तंत्रज्ञानावर अधिक भर देत असून, यापुढील काळात यावरच कंपनीचा जोर असल्याचे सांगत इतक्यात कंपनी स्वस्तातली स्कूटर किंवा मोटर सायकल तयार करणार नसल्याचे बजाज ऑटोने स्पष्ट केले आहे.
कंपनीचे प्रबंध संचालक राजीव बजाज यांनी दहा हजारात स्कूटर आणि मोटर सायकल तयार करण्यास नकार दिला आहे. कंपनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादनं तयार करते. या उत्पादनांना स्वस्त करण्यात कंपनीला स्वारस्य नसून, पर्यावरण रक्षणासह ग्राहकांच्या सुविधांवर जोर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
स्वस्तात गाडी तयार करण्यापेक्षा त्यातील तंत्रज्ञानावर भर देणे गरजेचे असल्याचे बजाज यांनी स्पष्ट केले.