अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघ (यूबीओए) ने देशातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
महासंघाचे सरचिटणीस जी डी नदाफ यांनी दिलेल्या माहितीनुसार 1970 सालात बँक कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारच्या प्रथम श्रेणी अधिकाऱ्याच्या दर्जाचे होते. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ झाली आहे, तर बँक कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही तेच असल्याने त्यात वाढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.