देशातील निर्यात व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मंदीच्या काळात निर्यातदारांना दिलेल्या बेल आऊट पॅकेज मागे घेण्याऐवजी काही निवडक निर्यातदारांना यात सवलत देण्याचा विचार सरकार करत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.
अभियांत्रिकी क्षेत्रात सुधारणांना वाव असून, कपडा, आणि हस्तशिल्प क्षेत्रासाठीही प्रयत्न करण्याची गरज शर्मांनी व्यक्त केली आहे. मंदीमुळे देशातील निर्यातदारांना मोठा फटका बसला असून, निर्यात घसरली आहे.