चालू आर्थिक वर्षात गृह, कार, आणि कॅर्पोरेट कर्जच देशातील बँकांचा विकास दर वाढवण्यात मदत करेल असे मत आयसीआयसीआय बँकेच्या प्रबंध संचालिका चंदा कोचर यांनी व्यक्त केले आहे.
आर्थिक विकास दर पुन्हा एकदा गती पकडत आहे. गृह, वाहन, कार कर्ज दिल्याने बँकांचाच फायदा होणार असून, यामुळे बँकांच्या विकास दरात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
बँकेच्या नफ्यात सप्टेंबर महिन्यात 2.6 टक्क्यांची वाढ झाल्याने नफा 1,040 कोटीवर आला आहे.