वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » कच्च्या तेलाची आयात 41 टक्क्यांनी घसरली
Feedback Print Bookmark and Share
 
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात देशात कच्च्या तेलाची आयात 31.6 अब्ज डॉलरवर आली असून, यात 41 टक्क्यांची घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याने तेलाची आयात घसरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात मोठ्या प्रमाणावर तेलाची आयात केली जाते.

चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यात 31.6 अब्ज डॉलरचे 6.96 कोटी टन तेल आयात करण्यात आले. मागील वर्षातील याच कालावधीत देशात 53.78 अब्ज डॉलरचे तेल आयात करण्यात आले होते.

मागील वर्षातील ऑगस्ट महिन्यात कच्चे तेल 147 डॉलरवर गेले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर 70 डॉलरवर आले आहेत.
संबंधित माहिती शोधा