वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » जगभरात चार अब्ज मोबाईल कार्यरत
Feedback Print Bookmark and Share
 
मोबाईल आता काळाची गरज झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये मोबाईलधारकांची संख्या इतकी झपाट्याने वाढली की आज घडीला जगात चार अब्ज मोबाईल कार्यरत असून, 2013 पर्यंत मोबाईल जाहिरातींच्या माध्यमातून साडे चार अब्ज डॉलरचा महसूल जमा होणार आहे.

मोबाईल आकडेवारी जमा करणाऱ्या भारतातील इनफोर्मेट मोबाईल इंटेलिजन्सने ही आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील अनेक जण आज आपल्या मोबाईलवरच अधिक खर्च करत असल्याचे कंपनीने आपल्या तिमाही निकालात म्हटले आहे.

एक मोबाईल धारक दिवसाला 15 ते 20 मिनिटं केवळ मॅसेज पाठवण्यात खर्च करतो. मोबाईल चॅटिंगचेही प्रस्थ वाढल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनीचे अध्यक्ष केदार सोहोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक मोबाईल कंपन्यांनी नावीन्यपूर्ण हँडसेट बाजारात आणल्याने मोबाईलच्या माध्यमातून मनोरंजन करणाऱ्यांची संख्या वाढली असून, एक व्यक्ती दिवसाला 40 ते 45 मिनिटं केवळ आपल्या मनोरंजनासाठी खर्च करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
संबंधित माहिती शोधा