वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » पवार म्हणतात, 'तीन महिन्यात संपेल महागाई'
Feedback Print Bookmark and Share
 
देशात दुष्काळ पडल्याने महागाई वाढली असून, आगामी तीन ते चार महिन्यांमध्ये महागाई संपेल असी आशा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

खरीप पिकांचे नुकसान झाल्याने धान्याचे भाव वधारले आहेत. यामुळे दुष्काळाने धान्य तुटवडा निर्माण झाला आहे. आता रबी पिकांवर साऱ्या आशा असून, तीन ते चार महिन्यात महागाई कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

रबी पिकांची कापणी झाल्यानंतर धान्यांच्या आगामी दरांविषयी सांगता येणे शक्य असल्याचे सांगत आताच या विषयी काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
संबंधित माहिती शोधा