वाहन निर्मिती क्षेत्रातील व्हीई कमर्शियल व्हेकल्सच्या आयशर ट्रकच्या विक्रीत ऑक्टोबर महिन्यात 65.11 टक्क्यांची वाढ झाल्याने या कालावधीत कंपनीच्या 2,257 ट्रक विकल्या गेल्या.
मागील वर्षातील याच कालावधीत कंपनीने 1,367 वाहनांची विक्री केली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारतीय बाजारात कंपनीच्या वाहनांची विक्री 71.09 टक्क्यांनी वाढत 2,024 वर गेली आहे. मागील वर्षात याच कालावधीत कंपनीने 1,183 वाहनांची विक्री केली होती.
या कालावधीत कंपनीची निर्यात 26.63 टक्क्यांनी वाढत 233 वर गेली असून, मागील वर्षात कंपनीने 184 वाहनांची विक्री केली होती.