भारतीय निर्यात क्षेत्रात मंदीचा प्रभाव कमी झालेला नाही. अशा काळातही आगामी वर्षभरात विशेष आर्थिक क्षेत्र (सेज) निर्यातीत 15 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, निर्यात व्यवसाय 1,15,000 कोटीवर जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मागील वर्षात सेज निर्यात 9,689 कोटी रुपये होता. वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डी के मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदी असूनही देशातील सेज निर्यात क्षेत्रात 15 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यात निर्यात व्यवसाय 89,000 कोटी रुपयांवर होता.