स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात सेलने शिक्षण आणि संशोधन क्षेत्राच्या विकासासाठी बिर्ला इंस्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एंण्ड सायन्स (बिटस) पिलानिशी करार केला आहे.
सेलचे संचालक जी ओझा यांच्या उपस्थितीत एच आर संचालक एस पी पटनायक आणि पिलानीचे डिन प्रोफेसर जी सुंदर यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.