वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » अंबानी गॅस प्रकरण: पुन्हा सुनावणी सुरू
Feedback Print Bookmark and Share
 
न्यायमूर्ती रवींद्रन यांनी रिलायन्स बंधूंच्या खटल्यातून हात काढून घेतल्यानंतर आता पुन्हा नव्याने या प्रकरणावरील सुनावणी सुरू झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे वकील हरीश साळवे यांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या खंडपीठापुढे युक्तिवादास सुरुवात केली. त्यांचा युक्तिवाद सुरू असतानाच अनिल अंबानी यांचे वकील जेठमलानी यांनी त्यांना मध्येच थांबवत मुकेश यांच्या वकिलावर मुद्द्यांमध्ये बदल केल्याचे आरोप केले.

रवींद्रन यांनी या प्रकरणातून दोन दिवसांपूर्वीच माघार घेतली आहे. आपल्याकडे रिलायन्सचे शेअर्स असल्याने आपण माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर न्यायालयाने नव्याने खंडपीठ स्थापन करून सुनावणी सुरू केली आहे.

साळवे यांच्या युक्तिवादानंतर आपल्याला युक्तिवाद करण्यासाठी 30 मिनिटे देण्याची विनंती जेठमलानी यांनी न्यायालयाकडे केली आहे.
संबंधित माहिती शोधा