वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » विंडोज-7 भारतात स्वस्तात मिळणार?
Feedback Print Bookmark and Share
 
भारतातील पायरसीने वैतागलेल्या मायक्रोसॉफ्टने आता आपले विंडोज-7 हे उत्पादन भारतात 20 टक्के कमी दरात विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी लवकरच याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

भारतात मोठ्या प्रमाणावर पायरेटेड सॉफ्टवेअर विकले जाते. याचा मोठा फटका सॉफ्टवेअर कंपन्यांना बसत आहे. विंडोजच्या उत्पादनांच्या विक्रीवरही याचा परिणाम दिसून येत असल्याने कंपनीने भारतातील आपल्या उत्पादनांच्या किमतीत 20 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

विंडोजने याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी कंपनीने यासाठी खास योजना आखली असून, लवकरच कंपनी भारतात याची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.
संबंधित माहिती शोधा