डॉलरचे दर सातत्याने घसरत असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. याचाच परिणाम म्हणून आता सोने चक्क 18 हजार तोळे होण्याची शक्यता असून, दिल्ली बाजारात आठवडाभरापासून सोने 17600 रुपयांवर आहे.
भारतातील पायरसीने वैतागलेल्या मायक्रोसॉफ्टने आता आपले विंडोज-7 हे उत्पादन भारतात 20 टक्के कमी दरात विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी लवकरच याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
आगामी आठवड्यातही बाजारात तेजी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठवड्यातही बाजारात तेजी दिसून आली. मंदी ओसरेपर्यंत आर्थिक पॅकेज मागे घेणार नसल्याने सरकारने स्पष्ट केल्याने बाजारात तेजी दिसून आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.