भारतीय रिझर्व बँकेने महत्त्वपूर्ण व्याजदर न बदलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात जोरदार विक्री झाल्याने शेअर बाजार निर्देशांकाने तीनशे साठ अंशांची झेप घेतली.
राष्ट्रीय निर्देशांकही शंभर अंशांनी वधारला. रिझर्व बँकेने आर्थिक विकास दर आठ ते साडेआठ टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच केंद्राच्या निर्यातक्षम सॉफ्टवेअर तंत्रज्ञान वसाहती व तेल शुद्धीकरण प्रकल्पास करात सूट देण्याचा निर्णयाच्या सकारात्मक परिणामाने बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले.
निर्देशांकाने तीनशे बासष्ट अंशांची उडी घेऊन 17,378 पर्यंत झेप घेतली. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकातही एकशे पाच अंशाची वृद्धी होऊन 5,195 अंशापर्यंत निर्देशांक पोहचला.
|