महागाईचा दर आज 7.57 टक्क्यांवर पोहचल्यानंतर भारतीय बाजारावर याचा वाईट परिणाम दिसून येण्याची भिती असतानाच आज गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर बीएससीने 312 अंशांची उंच उडी घेतली.
राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांकही आज 62 अंशांनी वधारत बंद झाला. गुंतवणूकदारांचा उत्साह छोट्या आणि इतर शेअरमध्येही दिसून आला. बीएसईचा मिडकॅप 1.38 टक्के आणि स्मॉलकॅप 0.55 टक्के वधारत बंद झाला.
आज बाजारात बँकांसह अन्य काही महत्त्वाच्या शेअरर्स मध्ये चांगली गुंतवणूक दिसून आली.पहिल्या सत्राच्या प्रारंभीच शेअर बाजारात चांगली वाढ दिसून आली होती, हे सातत्य कायम राखत बाजाराने बंद होताना 312 अंशांची वाढ घेतली होती.
|