अमेरिकेत व्याजदर कमी होण्यासोबत आखाती देशात कच्च्या तेलातून भक्कम मिळकत झाली आहे. त्यातून आलेल्या पैशातून भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा वधारू लागला आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या कठोर उपाय योजना, महागाईचा वाढता दर याही शेअर बाजारात अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यापूर्वी आलेल्या तेजीनंतर निर्देशांक घसरल्याचे लक्षात घेता गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्प्याने नफा वसुली करणे आवश्यक आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक (बीएसई) पाच मे पासून सुरू होणार्या आठवड्यात 17981 अंशावर बंद झाल्यास 18380 पर्यंत झेप घेऊ शकतो. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक (निफ्टी) 5343 अंशावर बंद झाल्यास 5463 अंशापर्यंत झेप घेऊ शकते. याचा आधार स्तर 5072 इतका आहे.
विश्लेषक हितेंद्र वासुदेव यांच्यानुसार बीएसई निर्देशांक झेप घेण्याकडे वाटचाल करत असून दुसर्या परीक्षणाच्या टप्प्यात आहे. या आठवड्यात साप्ताहिक रेझिस्टेन्स 17821-17942 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. आठवड्याती आधार स्तर 17400-17178-16978 या दरम्यान राहू शकतो. दोनशे दिवसांचा ईएमए व एसएमए 16907 व 17424 अंश आहे. मागील आठवड्यात निर्देशांकाने 17575-18193 यादरम्यान प्रवेश केला होता. या स्तरात पुल बॅक स्तर 17942 अंश आहे. वरच्या बाजूने 17575-17942-18193 अंशाच्या स्तरावरही लक्ष ठेवावे लागेल.
दुसरीकडे जेपी मॉर्गनने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाचे लक्ष्य घटवून 22500 केले आहे. या संस्थेनुसार वाढता चलनफुगवटा व कठोर पत धोरण यामुळे बीएसई निर्देशांकाचे लक्ष्य घटवणे भाग पडले. अगोदरच्या निर्धारित लक्ष्यापेक्षा हे 18 टक्क्यांनी कमी आहे. हँगसँग चाईनं इंडेक्सचा अंदाज 16 टक्क्यांनी घटवून 18500 अंश, बीएसईचे सर्वाधिक अनुमान 18 टक्क्यांनी घटून 22500 अंश, हँगसँग इंडेक्सचे लक्ष दहा टक्क्यांनी घटून 3500 व फिलिप्स शेअर बाजाराचे इंडेक्सचे सर्वाधिक अनुमान 28 टक्क्यांनी घटून 3400 अंश करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या कोस्पी इंडेक्सचे लक्ष 14 टक्क्यांची कमी करून 1970 अंश, इंडोनेशियामधील जर्काता कॉम्पोझिट निर्देशांकाचे अनुमान 12 टक्क्यांनी घटवून 2800 अंश व मलेशिया येथील क्वालालंमूर कंपोझिट निर्देशांकाचे लक्ष 7 टक्क्यांनी घटवून 1500 अंश करण्यात आले आहे. मात्र तैवानचा थाई इंडेक्सचे अनुमान 3 टक्क्यांनी अधिक करून 16500 अंश करण्यात आले आहे.
भारतासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व पाकिस्तान शेअर बाजार इंडेक्समध्ये अमेरिकी डॉलरमध्ये प्रतिफल 20 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पुढच्या आठवड्यात आलेल्या फ्लॅक्स, सेंचुरी टेक्सयाइल्स, जेएसडब्लयू स्टील, युनियन बँक ऑफ इंडिया, अशोक लेलँड, एशियन पेंट्स, अपोलो टायर, बॉलटॅम्प ट्रांसफॉर्मर, बॉटलीबाय, इलक्ट्रोथर्म, एमएम फोर्जिंग, महिंद्रा फोर्जिंग, पंजाब टक्रॅक्टर व नॅशनल पॅराक्झाइड सहित अनेक कंपन्यांनी वार्षिक अंदाज सादर करतील.
सध्या कॉर्पोरेट कंपन्यांचे निकाल जाहीर होत आहेत. प्रमुख 988 कंपन्यांच्या निकालांचे विश्लेषण केल्यास तिमाहीच्या आधारे सरासरी शुद्ध लाभात 17.10 टक्के व शुद्ध विक्रीत 21.60 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. वार्षिक आधारावर शुद्ध नफा 27.30 टक्के व शुद्ध विक्री मध्ये 23.40 टक्क्यांचा जबरदस्त फायदा झाला आहे. या आठवड्यात गुंतवणुदार वलटॅम्प, प्राज इंडस्ट्रीज, फिलिप्स कार्बन ब्लॅक, कोटक बँक, टोरेंट फार्मा, एबीसी बेयरिंग, टायटन इंडस्ट्रीज, देना बँक, इंडिया ग्लायकोल, बाटा इंडिया व गुजरात स्टेय पेट्रोनेट यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
(हे लेखकाचे व्यक्तीगत मत आहे. कोणत्याही प्रकारच्या जोखमीची जबाबदारी बेबदुनियावर नाही.)
|