मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बाजाराला जड झाले 'महागाईचे' ओझे  Search similar articles
गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबई शेअर बाजारात सारखे चढ- उतार सुरू असून, गुरुवारी बाजारात 255 अंशांची तर निफ्टीत 90 अंशांची वाढ झाल्यानंतर आज पुन्हा एकदा बाजार 198 अंशांनी घसरल्याने वाढत्या महागाईचे दडपण बाजारावर स्पष्टपणे जाणवत आहे. निफ्टीही 49 अंशांनी तुटला.

24 मे रोजी संपलेल्या आठवड्यात महागाईदर 0.14 टक्क्यांनी वाढली असून हे दर आता 8.24 टक्क्यांवर पोहचले आहेत. 2004 च्या ऑगस्ट महिन्यानंतर प्रथमच महागाईने आठचाही पल्ला ओलांडला आहे.

अमेरिकी बाजारात चांगली वाढ दिसून येत असताना आणि आशियाई बाजारात सकारात्मक बदल होत असतानाही भारतीय बाजार मात्र महागाईखाली दबला आहे.

सत्राच्या प्रारंभी बाजार कालच्या 15769.72 अंशांच्या तुलनेत 145 अंश वरती 15914.41 अंशांवर उघडला. यानंतर 450 अंशांनी दणक्यात घसरत 15526.50 अंशांवर आला आणि बंद होताना 197.54 अंश घसरत अर्थात 1.25 टक्क्यांच्या नुकसान सोसत 15572.18 अंशांवर आला.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशा असल्याने बाजारावर परिणाम दिसून येत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बीएसईच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 50.14 आणि 39.54 अंशांचे नुकसान झाले.
आणखी
बाजारात पुन्हा नवचैतन्य
पेट्रोलियम किंमतींचे बाजाराला ग्रहण
मुंबई शेअर बाजारावर मंदीचे सावट
तेलावरून पुन्हा बाजार घसरला
बाजारावर मंदीचे सावट कायम
शेअर बाजारासाठी 'गुड फ्रायडे'