मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शेअर बाजाराला महागाईचे चटके  Search similar articles
वार्ता
महागाई वाढण्याने निर्माण झालेली परिस्थिती आणि एकुणातच जागतिक बाजारपेठेत असलेला विक्रीचा दबाव या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारही आज उसळून दाणकन आपटला. बाजार संपला तेव्हा तो ५०६.०८ अंशांनी तर निफ्टी १२६.८५ अंशांनी कोसळल्याचे स्पष्ट झाले.

अमेरिकेतील मेमधील बेरोजगारीचे आकडे आल्यानंतर त्याचा परिणाम येथील बाजारावर पडणार हे अपेक्षित होतेच. आशियाई शेअर बाजार बर्‍याच खालच्या अंकावर उघडल्याचे समजताच बीएसई व एनएसईसुद्धा दबावाखालीच उघडले गेले. विश्लेषकांच्या मते महागाईचाच परिणाम बाजारावर झाला आ हे. कच्च्या तेलाच्या किमती शुक्रवारी १३९.१२ डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. त्याचा मोठा धसका बाजाराने घेतला होता. याचा अर्थ महागाई आणखी वाढणार असाच होता. पण आज या दरात अंशतः घसरण होऊन हे भाव १३७ डॉलर प्रती बॅरलपर्यंत आले होते.

आज सेन्सेक्स शुक्रवारच्या १५ हजार ५७२ अंशांच्या तुलनेत ४५६ अंश कोसळून १५ हजार ११४ अंशांवर खुला झाला. मंदीचे हे सत्र शेवटपर्यंत सुरू होते. दिवसभर खाली वर जाऊन येऊन अखेर तो ५०६.०८ अंशांनी कोसळल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आज सेन्सेक्स बंद झाला तेव्हा तो १५ हजार ०६६ .१० अंश होता.

बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे २.८३ व ३.६३ टक्क्यांची घसरण झाली.
आणखी
बाजारात सुरूच राहील साप-शिडीचा खेळ
बाजाराला जड झाले 'महागाईचे' ओझे
बाजारात पुन्हा नवचैतन्य
पेट्रोलियम किंमतींचे बाजाराला ग्रहण
मुंबई शेअर बाजारावर मंदीचे सावट
तेलावरून पुन्हा बाजार घसरला