मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बाजारात पुन्हा नवचैतन्य  Search similar articles
चालू आठवड्यात मुंबई शेअर बाजाराची रुळांखाली उतरलेली गाडी बुधवारी पुन्हा रुळांवर आल्याने मुंबई शेअर बाजारात नवचैतन्य संचारले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बाजारात सातत्याने घसरण दिसून येत होती. मंगळवारी तर बाजार 15 हजारांखाली आल्याने गुंतवणूकदारांसह सरकारच्या डोक्यावर आट्या पडल्या होत्या.

आज बाजाराने चांगली सुरुवात केली.अमेरिकी बाजारात सातत्याने चढ-उतार सुरूच असल्याने भारतीय बाजारातही आज अस्थिरता दिसून येईल हे मत बाजाराने खोडून काढत गेल्या दोन दिवसांची रिकामी जागा भरून काढली.

निर्देशांक 296 आणि निफ्टी 74 अंशांवर बंद झाला. या वाढीमुळे बाजाराच्या निर्देशांकाने पुन्हा एकदा 15 हजारांचा तर निफ्टीने 4 हजार 500 चा टप्पा गाठला आहे.

स्मॉलकॅप आणि मिडकॅप सुचकांकातही अशीच वाढ दिसून आली. मंगळवारी धातू, आयटी आणि बँकिंग क्षेत्रात जोरदार विक्री झाली होती, याची कसर भरून काढत याच क्षेत्रात आज गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदीवर अधिक भर दिला.
आणखी
शेअर बाजार 15 हजार अंशांखाली
शेअर बाजाराला महागाईचे चटके
बाजारात सुरूच राहील साप-शिडीचा खेळ
बाजाराला जड झाले 'महागाईचे' ओझे
बाजारात पुन्हा नवचैतन्य
पेट्रोलियम किंमतींचे बाजाराला ग्रहण