आशियाई बाजारात सुधारणांचे वारे वाहू लागल्याने सलग दुसर्या दिवशी गुरुवारीही मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली ही वाढ जरी किरकोळ असली, तरी गुंतवणूकदारांना दिलासा देणारी होती.
सत्राच्या मध्यंतरी बाजार पुन्हा कोसळत असताना बंद होताना त्याने उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 65 तर निफ्टीत 16 अंशांची वाढ दिसून आली.
बाजार बंद झाला तेव्हा बीएसई 15 हजार 250 अंशांवर तर एनएसईचा निफ्टी 4 हजार 539 अंशांवर बंद झाला.
|