आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या उत्साहाच्या वातावरणाचा चांगला परिणाम आज भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. मागच्या आठवड्यात बाजारात सातत्याने घसरणं होत होती.
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मात्र आज मुंबई शेअर बाजारात 206 तर निफ्टीत 55 अंशांची वाढ दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप सुचकांतातही आज 1.15 टक्क्यांची वाढ झाली.बाजार बंद होताना निर्देशांक 206.20 अंशांवर 15,395.82 अंशांवर तर निफ्टी 55.40 ने वाढत 4,572.50 अंशांवर बंद झाला.
आज बाजारात सर्वात जास्त विकले गेलेल्या शेअर्समध्ये आयसीआयसीआय, एअरटेल, एनटीपीसी, रिलायंस इन्फ्रा आदी शेअर्सचा समावेश आहे.
|