सलग दोन दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजारात चांगली उलाढाल झाल्यानंतर बुधवारी मात्र बाजार चांगलाच कोसळला. मंगळवारी बाजाराने त्रिशतक गाठले होते. बुधवारी यात २७५ अंशांची घसरणं झाली. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टीही ७१ अंशांनी घसरला.
काल अमेरिकी आणि युरोपीय बाजारात झालेल्या वाढीमुळे भारतीय बाजारही फुलला होता, आज मात्र या दोनही बाजारांमध्ये घसरणं झाल्याने भारतीय बाजारातही घसरणं दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद होताना २७५ अंशांनी घसरत बाजार १५ हजार ४२२.३१ तर निफ्टी ७१ अंशांनी घसरत ४ हजार ५८२. ४० अंशांवर बंद झाला.
|